ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक
महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
पुणे- पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली असून अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड वय ५७ वर्षे यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आहे.त्यानंतर त्यांनी स्वत:वर देखील गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली ही धक्कादायक घटना आज दि.२४ जुलै सोमवार रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.पोलीस आयुक्त भारत गायकवाड,पत्नी मोनी गायकवाड वय ४४ वर्षे,पुतण्या दीपक गायकवाड वय ३५ वर्षे अशी मृतांची नावे आहेत या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.आज दि.२४ जुलै सोमवार रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भरत यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर गोळीबार केला या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.पत्नी आणि पुतण्याचा खून केल्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.भरत यांनी नेमकी ही हत्या का केली? त्यानंतर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.दरम्यान घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केला आहे.एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.