“महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही”-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याही पक्षातील लोकांना असे वाटते की,आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत यात वावगे काहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना वाटू शकते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत.आमच्या पक्षातील लोकांना भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटू शकते.शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत.दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही.मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणर नाही अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.