अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार
नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांच्या धर्तीवर जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी याकरिता येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय विभागामार्फत पीक स्पर्धा राबविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.सदरील निर्णयाबाबत शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत असून कृषी विभागाच्या या स्तुत्य निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत केले जात आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नांदगांव तालुक्यातील विविध भागात शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामुळे कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन तालुक्याचे एकूण उत्पादनामध्ये भर पडेल हा उद्देश ठेवून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे.याकरिता तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये मुंग व उडीद पिकाकरिता ३१ जुलैपूर्वी व इतर पिकाकारिता ३१ ऑगस्टपूर्वी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय विभागामार्फत करण्यात आले आहे.