“मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे त्यामुळे जशास तसे उत्तर देणारा”-उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर माणसे बाहेर पडल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी त्यावरून टोला लगावला की मोठे लोक बाहेर नाही पडले.तथाकथित मोठी माणसे बाहेर पडली पण ज्यांनी त्यांना मोठे केले ती माणसे माझ्यासोबत आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढा दिला मात्र शरद पवारांनी वेगळा मार्ग निवडल्याबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली.ज्याचा त्याचा मार्ग असतो.मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे त्यामुळे जशास तसे उत्तर देणारा,आरेला कारे करणारा मी आहे त्यामुळे मी लढतोय.शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे ते त्यांच्या पद्धतीने जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.