अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे काल दि.२६ जुलै बुधवार रोजी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी चांदुर बाजार तालुक्याला भेट देऊन अनेक भागांना भेट दिली आहे.यावेळी चांदुर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानाची पाहणी करण्यात आली. प्रसंगी तालुक्यातील असलेल्या ब्राथंडी विश्रोळी,नागरवाडी या भागातील पाहणी करून भेट देण्यात आली.काल दि.२६ जुलै बुधवार रोजी जिल्हाधिकारी दुपारी ०३:३० वाजता तहसील कार्यालय चांदुर बाजार येथे आगमन झाले व कार्यालयातील सर्व विभागांना भेट देवुन सुचना दिल्या.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वागत उपविभागीय अधिकारी अचलपुर व तहसीलदार चांदुर बाजार यांच्या वतीने करण्यात आले.त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ब्राह्मणवाडा थडी येथील पुलाच्या बांधकामास तसेच पुर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी येथे भेट देऊन उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग,कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना काही सूचना देण्यात आल्या.त्याचबरोबर कर्मयोगी गाडगेबाबांची कर्मभुमी नागरवाडी येथे भेट देऊन आश्रमशाळा व कलादालनास भेट देवुन सर्व माहिती जाणुन घेतली.जिल्हाधिकारी यांनी निरोप घेतांना नागरवाडी संस्थेस लेखी प्रतिक्रिया नोंदवुन समाधान व्यक्त केले व बापूसाहेब देशमुख यांनी केलेल्या इंद्रभवनाचे कौतुक करून नागरडवाडी संस्थेला हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच चांदुर बाजार तालुक्यातील पूर्ण भागाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.यावेळी नायब तहसीलदार विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.