Just another WordPress site

“शिवसेनेतल्या फुटीरांची माझ्या दारात यायची हिंमतच नाहीये” उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२७ जुलै २३ गुरुवार

राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत असून विधिमंडळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहेत.त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची सविस्तर मुलाखत घेतली असून त्यामधून उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी शिंदे गट,अजित पवार गट व भाजपावर हल्लाबोल केला आहे.‘आवाज कुणाचा, पॉडकास्ट शिवसेनेचा’ या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर माणसे बाहेर पडल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी त्यावरून टोला लगावला. मोठे लोक बाहेर नाही पडले तथाकथित मोठी माणसे बाहेर पडली पण ज्यांनी त्यांना मोठे केले ती माणसे माझ्यासोबत आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढा दिला मात्र शरद पवारांनी वेगळा मार्ग निवडल्याबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली.ज्याचा त्याचा मार्ग असतो.मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे त्यामुळे जशास तसे उत्तर देणारा,आरेला कारे करणारा मी आहे त्यामुळे मी लढतोय.शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे ते त्यांच्या पद्धतीने जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असे ते म्हणाले.नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री शरद पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले पण माझ्याकडे यायची कुणाची (शिंदे गट) हिंमत झाली नाही.बाळासाहेबांचे विचार चोरले वगैरे सगळे ढोंग होते.राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो वगैरे ते म्हणाले होते आता राष्ट्रवादीच्याच म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दरम्यान खिशात राजीनामे घेऊन फिरतोय या शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांच्या विधानावरही उद्धव ठाकरेंनी तोंडसुख घेतले असून २०१४ ते १९ काळात सत्ता होती तेव्हा याच महाशयांनी भाजपाबरोबर कसे बसायचे म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.आत्ता तिकडे गेलेले त्या वेळचे तथाकथित मंत्री मी न सांगता तेव्हा बडेजाव मारत होते की खिशात आम्ही राजीनामे घेऊन फिरतो.कुणी सांगितले होते तुम्हाला राजीनामे घेऊन फिरायला? का वेळ आली होती ती तुमच्यावर? ही सगळी तुमचीच वक्तव्य आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो,भाजपा शिवसैनिकांवर अन्याय करते म्हणून मी त्यांच्याबरोबर बसू शकत नाही असे म्हणून कल्याणला जाहीर सभेत राजीनामे देणारे हेच होते मग तेव्हा तुम्ही काय सोडले होते ? आणि मी तरी काय सोडले होते ? मला सगळे काही मिळाले आहे आणि मला उबग आलाय म्हणून मी आणखी काहीतरी मिळवायला जातोय असे कुणी बोलत नाहीये.मला आता सुखाचा वीट आलाय सगळे मिळाले आणखीन काय देणार म्हणून यापलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असे म्हणून जा ना.हे सत्य आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.शिवसेनेतल्या फुटीरांची माझ्या दारात यायची हिंमतच नाहीये त्यांना माझा स्वभाव माहिती आहे.शिवसेनेची,बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.