प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णालय उपलब्ध करून द्या- संघरत्न सरदार यांची निवेदनाद्वारे मागणी
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाद्वारे अकोला जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुका सोडून जवळपास महाराष्ट्रभर व अनेक ठिकाणी सदरील योजना राबविली जात असून अनेक रुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.मात्र अंजनगाव सुर्जी तालुक्यात या योजनेचा पुरता बोजवारा झाला असून रुग्णांना या योजनेचा लाभ घेण्याकरीता मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सदरहू सदरील योजनांचा लाभ तालुक्यातील रुग्णांना देण्यात यावा या मागणीचे निवेदन आज दि.२६ जुलै बुधवार रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संघरत्न सरदार यांच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डोंगरे यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाचे अंजनगाव सुर्जी तालुका सोडून जवळपास महाराष्ट्रभर व अनेक ठिकाणी रुग्णालय अस्तित्वात व रुग्णांच्या मदतीत सुरू आहे तसेच रुग्ण बरे होऊन योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसत आहे.पण अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे रुग्णालय नसल्याने सर्व सामान्य गोरगरीब जनतेला मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.खाजगी दवाखाना व हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत पैशांची लूट होताना दिसत आहे. साधारणता टायफाईड,मलेरिया,पेशी,निमोनिया,असंख्य किरकोळ आजार,सर्दी,ताप,खोकला आजारासाठी औषध उपचार घेण्याकरिता गोरगरीब जनतेजवळ पुरेसे पैसे नसल्याने जीवितासोबत खेळ खेळावा लागत आहे.उधार कर्ज घेऊन आजारापासून बरे होण्याकरिता कसरत करावी लागत आहे.तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे रुग्णालय उपलब्ध करून दिल्यास गोरगरीब जनतेला या योजनेअंतर्गत मोफत उपचाराची सोय उपलब्ध होणार आहे.तरी आपण आपल्या स्तरावरून तातडीने लक्ष घालून रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संघरत्न सरदार यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डोंगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.