अंजनगाव सूर्जी ग्रामीण रुग्णालयात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढिवसानिमित्ताने रुग्णांना फळ वाटप
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी ग्रामीण रुग्णालय येथे आज दि.२७ जुलै गुरुवार रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेना यांच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप तसेच वृक्षरोपण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तालुक्यातील अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात आज दि.२७ जुलै गुरुवार रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढिवसानिमित्ताने रुग्णांना फळ वाटप तसेच वृक्षरोपण करण्यात आले.यावेळी सर्व पदाधिकारी यांनी रूग्णालयातील रुग्णांना आस्तेवाईकपणे त्यांच्या तब्बेतीविषयी विचारपूस करून त्यांना रुग्णालयातून योग्य ती औषध तसेच त्यांचा योग्यवेळी इलाज केला जातो कि नाही याची विचार पूस सुद्धा करण्यात आली.प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख कपिल देशमुख,शहर प्रमुख राजेंद्र आकोटकर,गजानन विजेकर,शुभम कहार, नितीन निंबोकार,अभिजित भावे,गजानन चौधरी,सचिन गावंडे,गजानन लवटे,फिरोज खान,विकास येवले यांच्यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.