Just another WordPress site

राज्यातील सर्वच भागात आज अतिवृष्टीचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जुलै २३ शुक्रवार
राज्यातील सर्वच भागात आज दि.२८ जुलै शुक्रवार रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून २९ ते ३१ जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

राज्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर गेल्या आठ दिवसांत पावसाने चांगलेच थैमान घातले आहे मात्र अतिमूसळधार पाऊस २८ जुलैपर्यंतच राहील आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल.आज दि.२८ जुलै शुक्रवार रोजी कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र,विदर्भ व मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे तर २९ जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पट्ट्यामुळे तेलंगणा,ओडिशा,आंध्र प्रदेश,विदर्भ,कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यालाही आज शुक्रवारी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.