Just another WordPress site

कारमध्ये सहा एअरबॅग बसविणाबाबतची मुदत वाढविली;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून केंद्र सरकारने सहा एअरबॅग अनिवार्य करण्याबाबतची अंमलबजावणी हि १ ऑक्टोबर २०२२ पासून करण्यात येणार होती परंतु सध्या केंद्र सरकारने ही तारीख १ ऑक्टोबर २०२३ अशी एक वर्षापर्यंत वाढवली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.जागतिक पुरवठा साखळीतील समस्या लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की ऑटो इंडस्ट्रीला सध्या मागणी पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या अडचणींमुळे ऑटो इंडस्ट्रीवर परिणाम होत आहे.ही बाब लक्षात घेऊन एम १ श्रेणीतील वाहनांमध्ये सहा एअरबॅगच्या अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्यात येणार आहे.

Considering the global supply chain constraints being faced by the auto industry and its impact on the macroeconomic scenario, it has been decided to implement the proposal mandating a minimum of 6 Airbags in Passenger Cars (M-1 Category) w.e.f 01st October 2023.

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 29, 2022

 

  दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअरबॅग्ज असण खूप गरजेचे आहे.या एअरबॅग्सला सिलिकॉन कोटिंग असते.सोडियम ऑक्साइड वायूचा वापर एअरबॅग फुगवण्यासाठी केला जातो.कारचा अपघात होताच एअरबॅग्स उघडतात आणि प्रवाशांचे संरक्षण करतात.त्यामुळे दुखापतीची तीव्रता कमी होते.
Leave A Reply

Your email address will not be published.