Just another WordPress site

समान नागरी कायदा तसेच मध्यप्रदेश व मणिपूर येथील मानवतेला काळे फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे जनआक्रोश मोर्चा

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ जुलै २३ शुक्रवार

आदिवासी हा या देशाचा मुलनिवासी भुमिपुत्र आहे असून जल,जंगल व जमीनीचा तो अनभिषिक्त सम्राट आहे.निसर्गाशी आदिवासींचे आई इतकेच अभेद्य नाते आहे.आदिवासी स्वतःची स्वतंत्र ओळख जीवाच्या आकांताने जपत राहिला.संविधान निर्माण कर्त्यानेही आदिवासींच्या स्वतंत्र ओळखीला कायद्याचे अधिष्ठान देत सार्वभौमत्व प्रदान केले मात्र वर्तमानात आदिवासींना सर्व पातळ्यांवर उध्वस्त केले जात आहे.विकास, पर्यावरण,वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात विस्थापित केले जात आहे.संविधानाचे अनुच्छेद २४४,५ वी सुची,६ वी सुची नष्ट केले जात असुन आदिवासी ही ओळख पुसुन हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांच्यावर ब्राम्हणत्व थोपवले जात आहे.समान नागरी कायदा निर्मितीचा घाट घातला जात आहे.समान नागरी कायदा जर या देशात लागु झाला तर अनु.जाती,इतर मागास वर्ग व धार्मिक अल्पसंख्याक यांचे तर नुकसान होईलच त्यापेक्षा जास्त नुकसान आदिवासींचे होण्याची शक्यता आहे.आदिवासींना संविधानाने दिलेला “कस्टमरी लॉ” बाधित होणार असुन त्यामुळे आदिवासींची स्वतंत्र ओळख नष्ट होणार आहे.धार्मिक अल्पसंख्याक मुस्लिम,ख्रिश्चन,बौध्द,शिख,जैन व इतर यांच्या रुढी परंपरा,संस्कारविधी,संस्कृती,विवाह,विधी व इतर बाबींसाठी संविधानाने जे अधिकार व स्वातंत्र्य दिले आहे ते बाधित होण्याची दाट शक्यता आहे व त्याचीच परिणती म्हणून मध्यप्रदेशातील लघुशंका प्रकरण,मणिपुर येथे आदिवासी महिलांची नग्न धिंड काढुन त्यांच्यावर माणुसकीला काळे फासणारे अत्याचार यासारखे प्रसंग घडत आहेत.किंबहुना अनुसुचित जाती तसेच धार्मिक अल्पसंख्याकांवर भारतात ठिकठिकाणी अत्याचार होत आहेत या बाबींच्या निषेधार्थ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.एन.रेकवाल यांच्या नेतृत्वाखाली व वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात सर्वच जिल्ह्यांत जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे.याचे द्योतक म्हणून काल दि.२७ जुलै गुरुवार रोजी सदरील जनआक्रोश मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन करण्यात येऊन बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व इतर सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सदरील मोर्चाचे नेतृत्व खुमानसिंग बारेला राज्य सदस्य राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,गफुर तडवी जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,ताराचंद भील व प्रमोद पोहेकर यांनी केले.सदर मोर्चात जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाजातील अनेक सामाजिक संघटना सामील झाल्या होत्या.या आक्रोश मोर्चात ॲड.रणजित तडवी,ॲड.गणेश सोनवणे,सुमित्र अहिरे,मोहन शिंदे,राजु खरे,विनोद रंधे,किशोर सुर्यवंशी,भिका कोळी,योगेश कोळी,धनराज बंजारा,जगदीश सपकाळे,अकीलभाई,नंदलाल आगारे,सुदाम पारधी,डॉ.शाकीर शेख,सुनिल देहडे,देवानंद निकम,विजय सुरवाडे,खुशाल सोनवणे,राहुल सोनवणे,भगवान कांबळे,अमजद रंगरेज,सुकलाल पेंढारकर,इरफान शेख,शशिकांत सावकारे,संजय कदम,राष्ट्रपाल सुरडकर,भागवत सुतार,सुरेश धनगर,डॉ.बि-हाडे,अजय गरुड,सतीष गायकवाड,नितीन अहिरे,रेवसिंग पावरा,दियाल पावरा,कुंवरसिंग पावरा,किसन बारेला,आर.बी.परदेशी,किरण बि-हाडे,महेंद्र जोहरे,नितीन गाढे,कुंदन तायडे,पंकज तायडे,ब्रिजलाल इंगळे,वानखेडे साहेब,फहीम पटेल,मतीन पटेल,सुनिल साळवे,पितांबर अहिरे,रविंद्र सोनवणे,जाकीर तडवी,अनिल तडवी,अफजल तडवी,गनी तडवी,नबाब तडवी,जमाल तडवी,मुराद तडवी,अलिरखान तडवी,सिताबाई गारुडी,भिकन तडवी,बागुल मॅडम,नबाबाई तडवी,सोनाली तडवी,रुबीना तडवी,करुशाद तडवी,हिना तडवी,आलेरखा तडवी,मोईन्दीन तडवी,उज्ज्वला इंगळे,कल्पना म्हस्के,अनिता पेंढारकर,दिपाली पेंढारकर,संभाजी दांडगे,शेख सोहेल,अशफाक शाह,मधुकर जोहरे,राहुल सपकाळे,विजय निकम,भास्कर जोहरे,शहारुख तडवी,अमीर तडवी,राजु जोहरे,अमीन रशीद,ईश्वर ढिवरे,सै.हमीद,रज्जाक खान कबीर खान,शरीफ लोहार,सरवर तडवी,उखर्डु तडवी,रज्जाक तडवी,फारुक तडवी,अविनाश जोहरे,शे.सोहेल शे.शकील,अशफाक गुलाम रसुल खान,श्रीकांत शिरसाठ,काशिराम बारेला,विनोद तडवी,आमर तडवी, सिध्दार्थ खरे,सायबु तडवी,जलाल तडवी,मुस्तफा तडवी, रविंद्र गायकवाड,अनिकेत लोंढे,प्रथमेश महाले, प्रद्युम्न वारडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.