Just another WordPress site

गावठी दारू विरोधात ब्राह्मणवाडा पोलिसांची धडक मोहीम

वेगवेगळ्या धाडीत ६ लक्ष रुपयांचा माल जप्त;४२ हजार लिटर दारू जागेवर नष्ट

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

हातभट्टी दारुमुळे मोर्शी हद्दीत झालेल्या दोघांच्या मृत्यूमुळे जिल्हा पोलिस ॲक्शन मोडवर असून ब्राह्मणवाडा पोलिसांनी गावठी दारूविरोधात धडक मोहीम उघडली आहे.गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या गाडीमध्ये ६ लक्ष १० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून ४२ हजार लिटर दारू जागेवरच नष्ट करण्यात आली आहे.सदरील धडक कारवाईचे परिसरात कौतुक केले जात आहे.

ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीतील सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेशातून गावठी दारूची निर्मिती वाहतूक चोरीछुपे मार्गाने होत असून त्यावर आळा बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे.दि.२५ जुलै रोजी गावठी दारूची निर्मिती व वाहतूक करणारे रुपेश अंबादास पचारे वय २५,नामदेव हरी ओम ठाकरे वय २४,मोहम्मद जाकीर शेख ईसराईल वय ४५ सर्व राहणार ब्राह्मणवाडा थडी यांना अटक करून त्यांच्याकडून १०० लीटर दारू किंमत २० हजार रुपये,प्लाटीना मोटरसायकल किंमत ६० हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर दि.२६ जलै रोजी मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील आठनेर येथील ठाणेदार विजय माहुरे यांना माहिती देवून संयुक्त कारवाई करण्यात आली यामध्ये २० ड्रम मोहा फुल सडवा ४०० लिटर किंमत ४ लक्ष रुपये, १०० लिटर दारू किंमत २० हजार रुपये असा एकूण ४ लक्ष २० हजार रुपयांचा माल जागीच नष्ट करण्यात आला तसेच दि.२७ जुलै रोजी मो.जाकीर शेख ईसराईल वय ४५,रुपेश अंबादास पचारे वय २४ दोन्ही राहनार ब्राह्मणवाडा थडी यांना पुन्हा अटक करून त्यांच्याकडून १०० लिटर दारू किंमत २० हजार रुपये व होंडा शाईन गाडी किंमत ९० हजार रुपये असा एकूण १ लक्ष १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत एकुण ६ लक्ष १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक शशीकांत सातव,अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणवाडा थडीचे पोलीस निरीक्षक उल्हास राठोड,अंमलदार साहेबराव राजस,धर्मासिह उईके,हेमंत येरखडे,राजू मरसकोल्हे,अनुप मानकर,सुशील गुल्हाने,शरद जनबंधु यांनी केली.ब्राह्मणवाडा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईबद्दल पोलिसांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.