Just another WordPress site

गुरुजी टेबलवर झोपून फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल; मास्तरांनी कमरेत कळ आल्याचे कारण केले समोर

अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२९ जुलै २३ शनिवार
जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) तालुक्यातील घोगर्डा जिल्हा परिषद शाळा १ ते ४ ती पर्यंत आहे एकूण संपूर्ण पटावर १० विद्यार्थी संख्या असून मागील वर्षी १४ वरुन यावर्षी १० वर आली आहे.या शाळेत मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे मुले शाळा शिकत असून श्रीमंत लोकांनी आपली मुले शिक्षण घेण्याकरिता बाहेरगावी शिकवत आहेत.गरीबाचा वाली कोणी नसल्याने असला प्रकार होत असल्याचे तेथील पालकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील घोगर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत दि.२७ ला दोनच्या दरम्यान शाळेतील शिक्षक व्हि.एम.पुसाम चक्क मुख्याध्यापक कक्षात बेंचवर झोपून फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ काल दि.२७ ला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने संपूर्ण तालुक्यात गुरुजी शाळेत झोपण्याची चर्चा झाली आहे.

घोगर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण दहा विद्यार्थी असून या दहा विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता दोन शिक्षक आहेत त्यापैकी एक महिला शिक्षिका असलेल्या आजारी रजेवर असल्यामुळे शाळेत मुख्याध्यापकांचा प्रभार असलेले व्हि.एम.पुसाम माध्यन्य भोजनाच्या कालावधीत फोनवरून बोलत असताना छोट्या बेंचवर रेटलेले आढळले त्याचक्षणी त्यांचा कुणीतरी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला असून तो संपूर्ण तालुक्यात पसरला.या संपूर्ण प्रकाराबाबत गट शिक्षण अधिकारी शरद कानेरकर यांनी संबंधित शिक्षकांना तीन दिवसात खुलासा सादर करण्यात बाबत पत्र दिले असून केंद्रप्रमुख राहुल रोकडे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

मास्तरांनी कमरेत कळ आल्याचे केले कारण समोर..

शाळेत दोन शिक्षक असून माझ्या सहकारी असलेल्या शिक्षिका आजारी रजेवर होत्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर होती तसेच मुख्याध्यापकांचा चार्ज असल्यामुळे प्रशासकीय कामे मला करावी लागतात.माध्यन्य भोजनाची वेळ असल्यामुळे सर्व विद्यार्थी खिचडी घेऊन जेवण करत होती त्याचवेळी वेळ असल्यामुळे शाळेतील अहवाल लिहत असतांना अचानक कमरेत कळ आल्यामुळे जागीच असलेल्या बेंचचा आधार घेऊन त्या ठिकाणी थोडा रेटलो तसेच सकाळपासून शारीरिक प्रकृती माझी बरी वाटत नव्हती त्यामुळे अस्वस्थ सुद्धा वाटत होते. मी रेटलेलोअसतांना एका सहकारी शिक्षकाचा फोन आल्यामुळे तो मी उचलला व त्याच्यासोबत बोलत असतांना नेमके त्याचवेळी शेजारील गावातील एक व्यक्ती दारूच्या नशेत तिथे येऊन त्यांनी माझा व्हिडिओ बनवला व तो सामाजिक माध्यमावर प्रसारित केला.असा खुलासा व्ही एम.पुसाम (शिक्षक) मुख्याध्यापक जि.प.शाळा घोगर्डा यांनी दिला आहे.

शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन येथे शिक्षकाची बाजू…

स्थानिक जिल्हा परिषद शाळा घोगर्डा येथील शाळा व्यवस्थापन समितीने एका निवेदनाद्वारे व्हिडिओ व्हायरल झालेल्या शिक्षक व्ही.एम.पुसाम यांची बाजू घेत शिक्षक अतिशय कर्तव्यदक्ष असून उत्कृष्टपणे शाळा चालवत असतात तसेच नियमित शाळेत येतात मधल्या सुट्टीत शाळेचे काम करत असतांना त्यांना आधीच कमरेचा त्रास असल्यामुळे कमरेत कळल्यामुळे शेजारी असलेल्या बेंचवर रेटले आज शनिवर रोजी शेजारच्या गावातील मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ काढला मुद्दामून घोगर्डा येथील शाळेची बदनामी करण्याचे उद्दिष्ट व्हिडिओ काढून व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.