अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३१ जुलै २३ सोमवार
जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी ) शहरातील लोकजागर संघटना व नगरपरिषद यांचे संयुक्त विद्यमाने बनलेल्या मियावाकी प्रकल्प बोराळा रोड गणपती नगर येथे डॉ.संगीता गोविंद मेन यांनी वाढदिवस साजरा करून नवीन पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.सदरहू येणा-या पिढीकरीता प्रेरणादायी हा प्रकल्प विवीध झाडांनी बहरलेला निसर्ग रम्य प्रकल्प असून या कार्यक्रमाला डॉ.संगीता गोविंद मेन यांनी मेनगेटला भेट देऊन निसर्गाच्या सानिध्यात आपला वाढदिवस साजरा केला.
सदरील कार्यक्रमला वडगाव नर्सरी येथील पर्यावरण प्रेमी गजानन वसु,गजानन पोटे,अंकुश माहुरे,भेलांडेसर,आनंद संगई,डॉ.सदानंद बर्मा ब्लड बँक,आनंद संगई,कौस्तुभ पाटील,संतोष चव्हाण,चंदुभाऊ गुलवाडे,पंतजली व लोकजागर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच गजानन सहारे,महादेवराव पेढेकर,सारीका मानकर,रजनी जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी व पर्यावरण प्रेमी बहुसंखेने उपस्थितीत होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता देवानंद महल्ले,नानाभाऊ शिंदी-जामेकर,संजय धारस्कर,पत्रकार अनिल गौर,निता मोगरे व गोविंद मेन यांचे विशेष सहकार्य लाभले.