Just another WordPress site

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधे गोळीबार ; एएसआयसह चार जणांचा मृत्यू

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३१ जुलै २३ सोमवार

जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आज दि.३१ जुलै सोमवार रोजी अंधाधुंद गोळीबार करण्यात आला  या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.या घटनेत आरपीए च्या एएसआय सह चार जणांचा मृत्यू झाला आहे.१२९५६ जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात गोळीबार झाला ही ट्रेन जयपूरहून मुंबईला चालली होती.

या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून आरपीएफ एएसआय टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.गोळीबार ज्या आरपीएफ  जवानाने केला त्याचे नाव चेतन असून त्याला अटक करण्यात आली आहे.गोळीबार केल्यानंतर त्याने उडी मारली मात्र त्याला मीरा रोड ते बोरीवलीच्या दरम्यान अटक करण्यात आली त्याची बंदुकही जप्त करण्यात आली आहे.जयपूर ते मुंबई सेंट्रल एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे यामध्ये आरपीएफच्या एएसआयसह चौघांचा मृत्यू झाला आहे.हा गोळीबार मीरारोड ते दहीसर दरम्यान झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे परंतु हा गोळीबार कोणत्या हेतूने करण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही.ही एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ला पोहोचताच ज्या डब्यात गोळीबार झाला तो डबा सील करत पंचनामा करण्यात आला आहे.लोहमार्ग पोलीस त्यांच्या मदतीसाठी आरपीएफ पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करतील अशी माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.