मुंबई,पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ ऑगस्ट २३ बुधवार
मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालय सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेत गेली तेरा वर्षापासून हजारो रुग्णांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करीत आहे.ही धर्मशाळा गेले तेरा वर्षापासून संत गाडगेबाबांचे भक्त मंडळी व हितचिंतक यांच्या सहकार्याने धर्मशाळा सुरू आहे.नुकताच झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत रुग्णांना मोफत मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून माता कनक्या सेवाभावी संस्था चंद्रपूर यांच्या सहकार्याने भोजनाची व्यवस्था केलेली आहे.सदरील धर्मशाळेचे व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी माननीय मंत्री महोदय यांना गेल्या वर्षी सुद्धा विनंती केली होती व तेव्हा सुद्धा एक महिन्याची मोफत भोजन व्यवस्था रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली होती.यावर्षी देखील एक महिन्याचे भोजन सुरू केले असून व्यवस्थापक अमोल ठाकूर हे नेहमी गोरगरीब लोकांना मोफत भोजन कसे मिळेल व त्यांना वैद्यकीय मदत कशी मिळेल यासाठी नेहमी प्रयत्न करतांना दिसून येत आहे.
संस्थेचे संचालक एकनाथजी ठाकूर यांनी धर्मशाळेतील अनेक वर्षापासून जुळवून ठेवलेले देणगीदार मंडळींच्या मार्फत या धर्मशाळेमध्ये संत गाडगेबाबा अन्नछत्र यांची स्थापना केली असून त्या अन्नछत्र मार्फत धानिक दाते मंडळी करून मदत गोळा करून अन्नछत्र गेल्या ३ वर्षापासून सुरू ठेवले आहेत व त्यांनी आव्हान देखील केला आहे.कोणाच्या घरामधील पुण्यतिथी किंवा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस असेल ते सुद्धा त्या ठिकाणी मदत देऊ शकतात ५५०० रुपये एक दिवसाचा खर्च आहे तसेच जे जे हाॅस्पिटल येथील धर्मशाळेत अन्नछत्र सुरू आहे.यादरम्यान मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी धर्मशाळेतील गोर गरीब लोकांना आर्थिक मदत व हाॅस्पिटलचे कोणतेही काम असो ते करतात.गेल्या ३०जुलै रोजी त्यांचा वाढदिवस धर्मशाळेत सर्व पेशंट व नातेवाईकांसोबत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात त्यांचे ओएसडी नितिन कुलकर्णी सहपरिवार उपस्थित होते व सागर खडसे व ईतर कर्मचारी मंडळी उपस्थित होती.