अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२ ऑगस्ट २३ बुधवार
महाराष्ट्र शासनाने गट ड वर्गातील वाहन चालकपद मृत घोषित करून त्याला कंत्राटी भरण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाने मागील दहा वर्षे पासून वाहन चालक भर्ती केली नाही.अमृत महोत्सव निमित्ताने ७५ हजार जागा भरण्याचे जाहीर केले असून त्यामधे अनेक पदे असून चतुर्थी वर्गातील वाहन चालक पद करार पध्दतीने भरण्याचा निर्णय सरकार घेतला आहे मात्र विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.बहुतांशी गरीब कुटुंबातील विद्यार्थी अनेक वर्षेपासून स्पर्धा परीक्षा अभ्यास करतात मात्र शासनाने कंत्राटी पध्दतीने पद भर्ती करून विद्यार्थी जखमेवर मीठ टाकण्याचा काम सरकार करत आहे.
यात अनेक पदे शासनाने कंत्राटी करून लाखो बेरोजगार युवक स्वप्न धुळील लावले आहे.सफाई कामगार पद सरकार नष्ट केले असून आता वाहन चालक पद नष्ट करण्याचा मार्गावर शासन आहे.शासन स्वतः भर्ती प्रक्रिया याबवत नाही मात्र खाजगीकरण भर सरकार जास्त दिसून येतो.महाराष्ट्र बहुतांश विद्यार्थीचे शिक्षण सर्वसाधारण वर्गातून झाले आहे त्यामुळे त्यांचा कल चतुर्थी व तुर्तीय वर्गाकडे जास्त आहे.पदवीधर आमदार अजूनपर्यत खाजगीकरण कुठलीही भूमिका घेतांना दिसले नाही.विद्यार्थी प्रश्न ते मांडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे सरकार निर्णय पुन्हा विचार करून आमचा प्रश्न विधिमंडळमध्ये मांडावा असे निवेदन आमदार बळवंत वानखडे यांना सादर करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते.