पोलीस नायक-मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार
तालुक्यातील धामणगांव बढ़े बस स्टॅंड परीसरात आठवाडा बाजार या वर्दळीच्या दिवशी ॲपेचालकाने स्वतःच्या मालकीची ॲपेरिक्षा हि सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामध्ये मधोमध आडवी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदरील चालकाविरुद्ध धामणगाव बढे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील धामणगाव बढे येथील बस स्टँड परिसरात ॲपेचालक सद्दाम शम्मु पटेल याने काल दि.२ ऑगस्ट या बाजाराच्या दिवशी स्वतःच्या मालकीची ॲपेरिक्षा क्र-एमएच-टी ३३४१ ही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामध्ये मधोमध आडवी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.याप्रकरणी सदरील ॲपेचालकाविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांनी गुन्ह्याची दाखल केला आहे.ही घटना २ ऑगस्ट रोजी धामणगाव बढे येथील बस स्थानक परिसरात घडली.सद्दाम शम्मु पटेल असे ॲपे चालकाचे नाव आहे या प्रकरणाची फिर्याद सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल संजय पांडुरंग जाधव यांनी दिली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.प.का. किशोर राजपूत हे करीत आहे.