यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार
तालुक्यातील डोंगरकठोरा येथे महसूल मंडळ भालोदतर्फे महसूल विभागामार्फत दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यानच्या महसूल सप्ताहानिमित्ताने येथील तलाठी कार्यालयात आज दि.३ ऑगस्ट गुरुवार रोजी महाफेरफार अदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायत कारभाराबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्दघाटन करण्यात आले.यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या होत्या.प्रसंगी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे सरपंच नवाज तडवी व उपसरपंच धनराज पाटील यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी केले.प्रास्ताविकात देवरे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला तसेच महसूल सप्ताहानिमित्ताने आयोजित फेरफार अदालत कार्यक्रमाची रूपरेषा,फेरफार निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती,ई हक्क प्रणाली प्रकरणे याबाबत माहिती विषद करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शासनाच्या वतीने महसूल सप्ताह का राबविला जात आहे याची माहिती देतांना ई पीक पाहणी,ई हक्क व ई चावडी संकल्पना याबाबत विस्तृत माहिती देऊन सदरील शासकीय योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी ई तंत्रज्ञानाची माहिती देतांना युरोप व अमेरिका येथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत माहिती सांगून शेतकऱ्यांना ई तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले.पुढील युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याचे नमूद करतांना उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी शेती तंत्रज्ञानाकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा व आधुनिक तंत्रज्ञानात सहभागी होण्याकरिता तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी ७/१२ वाटप नोंदी निर्गतीकरण करणे,इ हक्क ऍपबाबत मार्गदर्शन,शालेय विद्यार्थी जातीचे दाखले,वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखले तसेच उत्पन्न दाखले वाटप करण्यात आले तसेच शेतकरी यांच्या बांधावर जाऊन इ पीक नोंदणी याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
यानिमित्ताने येथील शेतकरी कांचन गोपाळ पाटील व मधुकर नरहरी जंगले यांच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी कार्ययक्रमाअंतर्गत ई पीक पाहणी करून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी ई पीक नोंदणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आला तसेच इ पीक नोंदणीबाबत विविध उद्द्भवणाऱ्या अडीअडचणी यावर उपस्थित केलेल्या शंकांचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलक व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.यावेळी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे,तलाठी कठोरा वसीम तडवी,तलाठी भालोद भारत वानखेडे,तलाठी सांगवी श्रीमती वाघ,तलाठी बोरखेडा खुर्द समीर तडवी,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामपंचायत सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,दिलीप तायडे,पद्माकर भिरूड,संगीता वाघ,’किताब तडवी,मधुकर जंगले,डिगंबर खडसे,छब्बीर तडवी,चंदन सोनवणे,प्रमोद झांबरे,शरद राणे यांच्यासह शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.