“शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?”-ठाकरे गटाची संभाजी भिडेंवर अप्रत्यक्ष टीका
सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत तसेच आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात.शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे.फडणवीसांना गुरुजी असतील पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे असा हल्लाबोल शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून केला आहे.मणिपूर व हरियाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या,फुले,आंबेडकर,शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे पण महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे.शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल? अशी अप्रत्यक्षपणे टीका ठाकरे गटाने संभाजी भिडे यांच्यावर केली आहे.