मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ ऑगस्ट २३ शनिवार
मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे.किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधींचा घोटाळा केला असा आरोप आहे.कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे असून यात किशोरी पेडणेकर यांचा सहभाग आहे असेही ईडीने म्हटले आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ANI ने या विषयीचे वृत्त दिले असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२० आणि कलम १२० ब या दोन कलमांच्या अंतर्गत किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल केला आहे.
“कोविड घोटाळा” उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी “कोविड कफन” मध्ये ही कमाई केली यात १,५०० रुपयांची बॉडी बॅग (मृतदेह बॅग) ६,७०० मध्ये विकत घेतली.वेदांत इन्नोटेक प्रा.लि. कंपनी,महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा/FIR दाखल असे ट्वीट किरीट सोमय्यांनी केले आहे.मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २ हजारांऐवजी ६८०० रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने (ED) म्हटले असून हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने म्हटले आहे.कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या त्यामुळे त्या जबाबदार असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.