अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील शेतकरी प्रदीप बंड यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठ मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत दोन एकर शेतामध्ये लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे ही किमया चांदुर बाजार तालुक्यातील युवा कास्तकार प्रदीप बंड या शेतक-याने दिवस रात्र मेहनत करून साधली आहे.जसापूर येथील युवा शेतकरी प्रदीपराव बंड वय ४५ वर्षे यांनी यावर्षी दोन एकरात टोमॅटोची लागवड केली आहे.टोमॅटो पीक घेत असतांना जुलै महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करून शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून लागवड केली होती.यात ५ फूट बाय २ बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले तसेच ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली व सहा वेळा जीवामृत झाडांना दिले.या दोन एकरात प्रदीप बंड यांनी आजच्या भावाने लाखो रु उत्पादन घेऊन शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
सदरहू चांदुर बाजार व अमरावती परतवाडा या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी सुरू असून ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट दर भाव असल्याने जसापूर येथील शेतकरी प्रदीप बंड सध्याच्या परिस्थितीमध्ये मालामाल झालेले पाहायला मिळत आहे.यात दिवस रात्र मेहनतच्या भरोशावर उत्पादन घेतलेला शेतकरी पाहायला मिळेल मात्र माझ्या मालाला ५०० रु भाव जरी राहला तरी सुद्धा मला या टोमॅटोमध्ये समाधान आहे असे भाव जर शेतकऱ्यांना मिळाले तर कुठलाही शेतकरी आत्महत्या किंवा कर्जबाजारी होणार नाही असे मत शेतकरी प्रदीप बंड यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान बी-बियाणेपासून तर मजुरी,फवारणी,खत,टोमॅटोचे झाडे बांधणे,फळे सोडणे,निंदण यासाठी दोन एकरमध्ये सरासरी दोन लक्ष रूपये खर्च झाला आहे खर्च वजा करून असेच भाव राहिले तर यात लाखो रु मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.