Just another WordPress site

अमरावतीकरांना मोदीजींकडून ऑनलाईन भेटीदरम्यान खा.नवनीत राणा यांना विविध कामांचे अभिवचन

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.७ ऑगस्ट २३ सोमवार

काल दि.६ ऑगस्ट रविवार रोजी अमरावतीकर मोदींजीना ऑनलाईन भेटले दरम्यान लवकरच मोदींजीना अमरावतीला आणून बडनेरा व्यागन कारखाना,चिखलदरा स्काय वॉक व बेलोरा विमानतळाचे लोकार्पण करणार असल्याचे खासदार नवनीत रवी राणा यांनी जिल्हावासियांना अभिवचन दिले आहे.दरम्यान खासदार नवनीत रवी राणा यांच्या अथक प्रयत्नांनी अमरावती बडनेरा वासियांना अनुभवायास आला.सदरील अदभुत अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते अमृत भारत योजनेअंतर्गत बडनेरा रेल्वे स्थानक पुनर्विकास भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने भूमिपूजन संपन्न झाले.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बडनेरा रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी काल दि.६ ऑगस्ट रविवार रोजी भव्य भूमिपूजन समारंभ पार पडला.

यावेळी मंचावर राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे,खासदार नवनीत रवी राणा,आमदार रवी राणा,मध्य रेल्वे भुसावळचे एडीआरएम सुनील कुमार सावन,शुक्ला साहेब,सिनियर डीसीएम श्री.पाठक,डीएसटी श्री.शंकधर यांच्यासह समाजसेवक सुदर्शन गाग,चंद्रकुमार जाजोदिया, लईक पटेल,नानकराम नेभनानी,चेंबर ऑफ कॉमर्सचे विनोद कलंत्री,भाजपाचे शिवराय कुलकर्णी,दिनेश सूर्यवंशी,संजय तिरथकर,मंगेश खोंडे,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे,माजी सैनिक संघाचे रॉय काका आदी उपस्थित होते.बडनेरा रेल्वे स्टेशन आता नव्याने रूप धारण करुन सर्व सुख सोयी युक्त होणार असल्याने खासदार नवनीत रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार डॉ.अनिल बोंडे,आमदार रवी राणा यांचे आभार मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.