Just another WordPress site

चोपडा येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

डॉ.सतीश भदाने,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.९ ऑगस्ट २३ बुधवार

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.

यानिमित्त येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपन्न केले यामध्ये प्रथम वर्ष बी फार्मसी मधून बाविस्कर साक्षी प्रशांत (प्रथम),माने अभिलाषा रतन (द्वितीय) व खान मोहम्मद झुहेब शाहालाम (तृतीय) तसेच द्वितीय वर्ष बी फार्मसी मधुन भोई सचिन धनसिंग (प्रथम),पाटील कुणाल भगवान (द्वितीय) आणि पाटील देवयानी मंगल (तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर तृतीय वर्ष बी फार्मसी मधून पवार प्रिया किशोर (प्रथम),बेलदार सृष्टी मंगलेश (द्वितीय) व उगले केदार सतीश (तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले तर चतुर्थ वर्ष बी फार्मसी मधून महाजन स्वाती अरुण (प्रथम),महाजन सुनीता शांताराम (द्वितीय) तसेच पाटील खुशबू सुनील (तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले.सदरील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे माननीय अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील,संस्थेच्या सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील यांनी केले.आम्हाला अशा विद्यार्थ्यांचा अभिमान आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमुळे यशस्वी ठरतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा देतो असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.तसेच नेहमी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तत्पर असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गौतम प्रकाशचंद्र वडनेरे,महाविद्यालयाचे प्रबंधक प्रफुल्ल मोरे,महाविद्यालयाचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा.तन्वीर शेख,प्रा.तुषार पाटील,महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रा.अतुल साबे,प्रा.किरण बाविस्कर,प्रा.डॉ.सुवर्ण लता महाजन,प्रा.प्रियांका जैन तसेच सर्व विभाग प्रमुख,महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदरील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.