Just another WordPress site

सौ.मिराबाई जगन्नाथ महाजन यांचे निधन

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.९ ऑगस्ट २३ बुधवार

येथील पवार नगर मधील रहिवासी तसेच मुळगाव  खिरोदा ता.रावेर येथील सौ.मिराबाई जगन्नाथ महाजन (वय ७८) यांचे आज दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे.

मिराबाई महाजन या खिरोदा येथील सेवानिवृत्त सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ.जे.के.महाजन यांच्या पत्नी तर चोपडा येथील ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन,सेवानिवृत्त क्लास वन अधिकारी नंदकुमार महाजन तसेच रामदास महाजन घरडा केमिकल्स, चिपळूण यांच्या मातोश्री होत.सौ.मीराबाई महाजन यांनी केलेल्या देहदानाच्या संकल्पानुसार त्यांचे शव जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आला.धार्मिक स्वभावाच्या असलेल्या स्व.मिराईंनी देहदान करुन समाजात एक आदर्श निर्माण केला असे श्रद्धांजली वाहतांना माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.