शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांची शासन दरबारी नोंद करा;पॉवर ऑफ मीडियाचे तहसीलदारांमार्फत शासनास निवेदन सादर
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१० ऑगस्ट २३ बुधवार
जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार जे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत मात्र त्यांना अधिस्वीकृती ओळखपत्र नाही अश्या सर्व पत्रकारांची नोंद शासन दरबारी करण्यात यावी या मागणीचे निवेदन काल दि.९ ऑगस्ट क्रांतीदिनी पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्यावतीने देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात पत्रकारांनी म्हटले आहे की,ज्या पत्रकारांना शासनाने अद्यापही अधिस्वीकृती दिली नाही परंतु ते गेल्या १० वर्षापेक्षाही जास्त काळापासून शहरी आणि ग्रामीण भागात ते पत्रकारिता करीत आहेत अश्या सर्वच पत्रकारांची शासनाने शासनदरबारी नोंद करावी.याबाबत अनेकदा शासनास आणि सर्वच लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आणि याकरिता आमच्या संघटनेच्या वतीने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता तरीही आमच्या मागणीची दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे याकडे देशाच्या प्रथम नागरिक म्हणून आपण जातीने लक्ष देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास याविरुद्ध तीव्र अश्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचेमार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी निवासी तहसीलदार बबन राठोड यांना पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष श्रीपाल सहारे,सचिव पवन ठाकरे यांचेसह निकेत ठाकरे,अरुण बनकर,नितेश कांनबाले,संदेश ढोके,अनिकेत शिरभाते,उमेश चव्हाण,आकाश कटकतलवारे,प्रदीप रघूते,गणेश माटोडे,सागर गावनेर,प्रशांत झोपाटे,विनेश बेलसरे,योगेश राऊत,अंकुश निमनेकर,देविदास गाडेकर,गजानन भस्मे,विजय नाडे,गोकुल खोडके,रमेश गंजीवाले,प्रमोद देशमुख,इत्यादी पत्रकार यावेळी उपस्थित होते.