चांदुर बाजार महसूल सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न
आमदार बच्चू कडू,एसडीओ श्रीकांत उंबरकर यांची उपस्थिती;टोम्पे महाविद्यालयात करण्यात आले आयोजन
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१० ऑगस्ट २३ गुरुवार
जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे महसूल सप्ताह निमित्त तालुक्यामध्ये विविध उपक्रम तहसीलदार गीतांजली गरड यांच्या उपस्थितीत गेल्या सात दिवस उपक्रम राबवून करण्यात आले.काल ९ ऑगस्ट रोजी समारोपीय कार्यक्रम गो.सी.टोम्पे महाविद्यालय येथील सभागृहात करण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित कर्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार बच्चू कडू हे होते तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर,तहसीलदार गीतांजली गरड,नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ,तालुका कृषी अधिकारी दांडेगावकर,विस्तार अधिकारी पंचायत सातंगे यावेळी उपस्थित होते.प्रसंगी श्रावण बाळ व संजय गांधी लाभार्थ्यांना आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी अभियान,फळझाड लागवड योजना यासह राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.तहसीलदार गीतांजली गरड यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून महसूल सप्ताहनिमित्त राबविण्यात आलेल्या विविध कामाबाबत माहिती दिली.नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ व उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांची यथोचित भाषणे झाली.अध्यक्षीय भाषणामध्ये आमदार बच्चुभाऊ कडू यांनी निराधार,विधवा व अपंग यांना मदतीचा हात द्या,गोरगरीब तसेच शेतकरी यांना कुठलाही त्रास होणार नाही यांची गांभीर्य पूर्वक दखल घेऊन तलाठी ग्रामसेवक व कुठलाही अधिकारी यांनी मदत करून सहकार्य करा.तसेच जो अधिकारी कोणी शेतकऱ्यापासून पैसे घेत असेल त्याला डायरेक्ट सस्पेंड करा असे आव्हान आपल्या भाषणातून बच्चू कडू यांनी केले.फळबाग लागवड व शासनाच्या विविध योजनांबाबत त्यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश ढगे यांनी केले.याप्रसंगी तालुक्यातील विधवा,अपंग,निराधार व ईकेवायसी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेकरिता तहसील कार्यालय चांदूरबाजार येथील सर्व मंडळ अधिकारी तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.