Just another WordPress site

‘‘ती बैठक गुप्त नव्हती,कुटुंबातील कोणा व्यक्तीला भेटण्यात गैर काय’’-अजित पवार गुप्त भेटीवरून शरद पवार यांचा प्रतिप्रश्न

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि. १४ ऑगस्ट २३ सोमवार
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची ‘गुप्त’ भेट झाल्याची राजकीय चर्चा रंगली असतांना त्यावर स्वत: शरद पवार यांनीच उत्तर दिले असून ‘‘ती बैठक गुप्त नव्हती.कुटुंबातील कोणा व्यक्तीला भेटण्यात गैर काय’’ असा प्रतिप्रश्न पवार यांनी केला आहे.सांगोला येथे शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ासाठी पवार आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

 

त्यावेळी त्यांना अजित पवार यांच्याशी कथित गुप्त भेटीबाबत विचारण्यात आले यावर ते म्हणाले की,अजित हा माझा पुतण्या आहे.पवार कुटुंबीयांतील मी वडीलधारा माणूस आहे त्यामुळे मला कोणी भेटायला यावे किंवा मी कोणाला भेटायला बोलावले हा चर्चेचा विषय असू शकत नाही.राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि काही नेते भाजापबरोबर सत्तेत सहभागी झाले असले तरी आपण मूळ राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन काम करणार आहोत.भाजपशी सलगी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.भाजपची विचारधारा आणि आमची विचारधारा वेगळी आहे त्यामुळे आपल्या भूमिकेत बदल होणार नाही असेही पवार यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.