Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ ऑगस्ट २३ सोमवार
मुंबईमध्ये लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून रेल्वे प्रवास सोयीचा आणि आरामशीर व्हावा याकरता रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे तसेच प्रवासीवहन क्षमता वाढवण्याकडेही भर दिला जात आहे.पिक अवर्समध्ये चाकरमन्यांना लोकल ट्रेनच्या दारात लटकून प्रवास करावा लागतो हा प्रकार टाळण्याकरता आणि एका ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करता यावा याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.१५ ऑगस्टपासून हा बदल लागू होणार असून १५ ऑगस्टपासून १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वेने आज दि.१४ ऑगस्ट सोमवार रोजी जाहीर केलेल्या माहतीनुसार ४९ लोकल १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत मिड डे ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.यात १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्यानंतर २५ टक्क्यांनी प्रवाशांची क्षमता वाढणार आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुंबई उपनगरी विभागातील लोकलमधून अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करता यावा याकरता उत्तम रेल्वे सेवा प्रदान करण्याच्या उपक्रमाअंतर्गत पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या ४९ लोकल ट्रेनचे १५ डब्यात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.सदरील बदल १५ ऑगस्ट २०२३ पासून प्रभावी होईल असे पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.हा बदल म्हणजे पश्चिम मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी मोठे वरदान ठरणार आहे असेही पत्रकात म्हटले आहे.यामुळे प्रत्येक ट्रेनची वहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे यासह पश्चिम मार्गाच्या मुंबई उपनगरी विभागात एकूण १५ डब्यांची रेल्वेची संख्या १५० वरून १९९ पर्यंत वाढेल.वाढीव डब्यांच्या २५ लोकल डाऊन मार्गावर तर २४ लोकल अप मार्गावरून धावणार आहेत.