अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१८ ऑगस्ट २३ शुक्रवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तसेच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनराव भुजबळ यांचे प्रथमच अमरावती येथे आगमन झाल्याच्या निमित्ताने त्यांनी सर्व प्रथम गाडगे नगर येथील खोडके परिवारास सदिच्छा भेट दिली याप्रसंगी आमदार सुलभाताई संजय खोडके व राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनी मंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सदरील कौटुंबिक भेटीनंतर ना.छगनराव भुजबळ यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला.राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान त्यांनी सर्व प्रथम खोडके यांच्या निवासस्थानी भेट दिली.दरम्यान ६ जून २०२३ रोजी रॉका नेता संजय खोडके यांच्या मातोश्री स्व.सुशीलाबाई विनायकराव खोडके यांचे निधन झाले होते त्यामुळे आपल्या भेटीत ना.छगनराव भुजबळ यांनी आ.सुलभाताई खोडके,संजय खोडके व यश खोडके यांच्याशी संवाद साधून पारिवारिक चर्चा केली.त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,विदर्भ कबड्डी असोसिएशन,सरकारी-निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समनवय समिती,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना,जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिल,अखिल भारतीय माळी महासंघ, महाराष्ट्र राज्य माळी समाज कल्याण महासंघ,अखिल भारतीय माळी महासंघ महिला आघाडी,ज्योती सावित्री माळी समाज महासंघ,क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन,राष्ट्रीय सरपंच संघ,कृषीमित्र प्रतिष्ठान,अमरावती जिल्हा शासकीय कृषी विभाग कर्मचारी पतसंस्था,जिल्हा वकील संघ, सकल चर्मकार समाज संघटना,संत रविदास विश्व प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना,अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटना, मॉर्निंग वॉकिंग ग्रुप,चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज,अमरावती जिल्हा परिषद कंत्राटदार संघटना,खाद्यपेय विक्रेता संघटना,अमरावती जिल्हा हौकी असोसिएशन,अमरावती जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशन,ज्योती सावित्री माळी विकास प्रतिष्ठान,सदगुरू बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक मंडळ गणेशपेठ,अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समनवय समिती,डिस्ट्रिक्ट इंजिनिअर्स असोसिएशन,शिवपुत्र फौंडेशन,नेताजी सुभाष मंडळ, अहिल्या महिला परिषद,रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्था,अमरावती गार्डन क्लब,महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज ऑर्गनायझेशन,एकता प्रॉपर्टी ब्रोकर्स असोसिएशन,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस परिवार संघटना,उर्दू टीचर्स असोसिएशन,जनरक्षक महासंघ आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने ना.छगनराव भुजबळ यांचे स्वागत करण्यात आले.