जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २३ शनिवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा व महानगर जळगांवच्यावतीने दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा दि.४ सप्टेंबर २३ रोजी जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून याकरिता सदरील जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत प्रमुख मार्गदर्शन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,माजी महसुल,कृषि,अर्थ, पाटबंधारे मंत्री आमदार एकनाथराव खडसे,माजी कृषि व परिवहन मंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर,माजी कृषि,परिवहन मंत्री आण्णासाहेब सतिशराव पाटील तसेच प्रदेश चिटणीस इजाजभाई मलिक हे उपस्थित राहणार आहेत.
तरी माजी खासदार,आजी माजी आमदार,प्रदेश पदाधिकारी,माजी जि.प सदस्य,माजी पंचायत समिति सदस्य,माजी नगरसेवक,विविध सोसायटी चेअरमन व सदस्य,मार्केट कमिटी सदस्य,जिल्हा पदाधिकारी,कार्यकर्त,महानगर पदाधिकारी,कार्यकर्त,सर्व विविध फ्रंटल सेल आघाडीचे अघ्यक्ष,सरचिटणीस,कार्यकर्त व कायम नियंत्रीत यांनी दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी १ वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय आकाशवाणी चौक जळगांव येथे उपस्थित राहावे असे आवाहन ॲड.भैय्यासाहेब रविन्द्र पाटील जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा जळगांव,अशोक लाडवंजारी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगर जळगांव,उमेश पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक जळगांव,रिंकू चौधरी महानगर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक महानगर जळगांव,वंदनाताई चौधरी जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा जळगांव,मंगलाताई पाटील महानगर जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी महिला आघाडी महानगर जळगांव यांनी केले आहे.