अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑगस्ट २३ रविवार
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण येथील शेतकरी कार्तिक फिसके यांच्या शेतात चारा कापण्यासाठी मजुर गेले असतांना अचानक त्यांना १२ फुट अजगर दिसला त्या मजुरांनी शेतमालकांला लागलीच फोनवरून सदरील अजगराबाबत माहिती सांगितली.त्यानुसार शेतमालक कार्तिक फिसके यांनी याबाबतची माहिती नांदगाव खंडेश्वर येथील सर्पमित्र अमन मालवे व रोशन देशमुख यांना माहिती दिली.सदर माहीती मिळताच ते ताबडतोब सदरील शेतात दाखल झाले.प्रसंगी सदरील अजगर पकडण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली व मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना अजगर पकडण्यास यश आले.
सदरील अजगराला पकडुन अमरावती येथील सर्पमित्र यांना बोलावून अमरावती जवळील दाटजंगलामध्ये सोडुन देण्यात आले.यावेळी सर्पमित्र अमन गवाले म्हणाले की,आजवर अनेक विषारी बिनविषारी सापांना पकडून जगंलात सुखरूप सोडण्याचे काम आम्ही केले असून शासनाकडुन आम्हाला सर्प मित्राचे अधिकॄत ओळखपत्र देण्यात यावे तसेच बऱ्याच वेळा सापांबद्दल असणारे गैरसमज,अंधश्रद्धा आणि भिती यामुळे त्यांना सर्रास मारले जातात मात्र सापांना न मारता जवळच्या सर्प मित्रांना बोलवावे जेणे करुन सापांचे प्राण वाचतील.सर्प हे शेतातील उपद्रवी उंदीर खातात त्यामुळे ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत असे सर्पमित्र अमन मालवे यांनी म्हटले आहे.