Just another WordPress site

अंजनगाव सुर्जी येथील वसुंधरा मियावाकी प्रकल्पास जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२४ ऑगस्ट २३ गुरुवार

काल दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वसुंधरा मियावाकी प्रकल्पास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी  सदिच्छा भेट दिली.सदरील प्रकल्पामध्ये अंजनगाव सुर्जी हद्दीतील नगरपरिषद व लोकजागर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २२ ते सप्टेंबर २२ पर्यंत हजारो पर्यावरण प्रेमींच्या हस्ते वीस हजार स्केअर फुट मध्ये चार हजार वनौषधी वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली होती.

सदरील मियावाकी जंगल पथदर्शी प्रकल्प जपानी वैज्ञानिक अकिरा मियावाकी यांच्या सुचविलेल्या घनवृक्ष लागवड पद्धतीने करण्यात आला होता.या मियावाकी जंगलामध्ये आवळा,बेल,अर्जुन,अग्निमाद्य,नागद्रोण,चिंच,फणस,जांभूळ,बिहाडा,पुत्र जीवा,फापडा,हत्ती फळ ह्यासारखे अत्यंत दुर्मिळ परंतु सातपुड्याच्या जंगल परिसरात उपलब्ध वनस्पतीची लागवड करून एका वर्षाच्या आत बहुतेक वृक्षांची वाढ १५ ते २० फूट अशी चमत्कारिक व अद्भुत असल्यामुळे सध्याचे नव्यानेच अमरावती जिल्ह्याचा पदभार सांभाळलेले जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आश्चर्य व्यक्त करून नगरपालिका व लोकजागर संघटना यांनी वृक्ष लागवड करून प्रोत्साहित व प्रोत्साहन देऊन आनंद व्यक्त केला.प्रसंगी लोक जागर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना एक वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी अशा प्रकारच्या नागरिकांना सोबत घेऊन पथदर्शी प्रकल्प यशस्वी करणाऱ्या लोकजागर संघटनेस भविष्यात शासनाकडून सर्वतोपरी उचित सहकार्य देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासित करण्यात आले.प्रसंगी उपविभागीय अधिकारी दर्यापूर,तहसीलदार अंजनगाव सुर्जी,उपविभागीय अभियंता जलसंधारण (जि.प.ल.पा.)अंजनगाव सुर्जी,नगरपरिषद मुख्याधिकारी,गटविकास अधिकारी अंजनगाव सुर्जी व लोकजागर संघटनेचे सर्व सदस्य व बहुतांश कार्यालयाचे पदाधिकारी व पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.