यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑगस्ट २३ गुरुवार
शहरातील अंकलेश्वर-बुऱ्हाणपुर राज्य महामार्गावर जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ६३ आंदोलनकर्त्यांनी परवानगी नाकारली असता जाणीवपुर्वक सामान्य नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असे कृत केले म्हणुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यावल शहरातील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर राज्य महामार्गावरील भुसावळ टी पॉईंट
या वाहतुकीच्या स्त्यावर जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असतांना देखील मध्यभागी थांबुन आंदोलन करीत सर्वसामान्य नागरिकांना व येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला म्हणुन पोलीस कर्मचारी सुशिल रामदास घुगे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पवन पाटील,प्रभाकर सोनवणे,मुकेश येवले,रवींद्र सोनवणे,संतोष धोबी,सुनिल उर्फ पप्पुजोशी,कदिर खान,अनिल जंजाळे,कडू पाटील,राकेश कोलते,उमेश जावळे,शाकीर तडवी,विलास तायडे,ललीत पाटील,उस्मान तडवी,राजु महाजन,कामराज घारू,चंद्रकांत महाजन,पराग पाटील,गौरव सोनवणे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या ६३ पदधिकारी आंदोलनकर्ते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशान्वये सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस करीत आहेत.