Just another WordPress site

जळगाव जिल्ह्यात पुन्हा’लम्पी’ साथीच्या आजारामुळे बळीराजाचे गोधन धोक्यात;बळीराजाला गुरांच्या लसीकरणाची प्रतीक्षा

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी)

दि.२६ ऑगस्ट २३ शनिवार

जिल्हाभरात पुन्हा एकदा ‘लम्पी’ आजाराची साथ सुरू झाली आहे असून बळीराजाचे गोधन पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.जिल्ह्यातील सात तालुक्यात आतापर्यंत ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून ७९ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच दिली आहे.लंम्पि आजार पुन्हा डोके वर काढत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.सदरील आजारावर लसीकरण कधी होणार ? असा प्रश्न बळीराज्याच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात गोवंशाची एकूण ५ लाख ७८ हजार जनावरे असून आगामी चार दिवसांत उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशूसंवर्धन उपायुक्त शशिकांत पाटील यांनी दिली आहे.जिल्ह्यातील चाळीसगाव,पाचोरा,भडगाव,एरंडोल,पारोळा, अंमळनेर व धरणगाव तालुक्यात ‘लम्पी’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून इतर तालुक्यांमध्येही या आजाराचा शिरकाव होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून चाळीसगाव तालुक्यात १७५ पशूधनाच्या आयुष्यावर ‘लम्पी’चे संकट उभे ठाकले आहे.’लम्पी’वर नियंत्रण मिळविण्यासाठी झालेल्या आढावा बैठकीत पशूसंवर्धन उपायुक्त शामकांत पाटील यांनी अहवाल सादर केला असून त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेश होईपर्यंत सातही तालुक्यातील गुरांचे भरणारे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तसेच जिल्ह्यात व अन्य राज्यातून होणारी पशूधनाची वाहतूक बंद करण्यात आली आहे त्याकरीता पोलिस व आरटीओ प्रशासनाने आंतरराज्य सिमेवर कसून तपासणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.