ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक
परभणी जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑगस्ट २३ शनिवार
वाढीव घरपट्टी व नळपट्टी तसेच सर्व करांवरील उपकर रद्द करण्यात यावेत यासह अन्य मागण्यांसाठी महानगरपालिकेवर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल दि.२५ ऑगस्ट शुक्रवार रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.सदरील मोर्चात विविध संघटनांसह व्यापारी तसेच परभणीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.या मार्चची शनिवार बाजारपासून सुरुवात करण्यात आली.यावेळी महापालिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. काहींनी महापालिका यंत्रणेची प्रतिकात्मक अंतयात्रासुद्धा काढली.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समारोप करून छोटेखानी सभेनंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.