अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आडगाव येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी? याची संपूर्ण माहिती देण्याचे काम सुमितर् इंडिया ऑरगॅनिक हे करीत आहेत.या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयी माहिती,सोयाबीनची संपूर्ण माहिती,व्यवस्थापन व किड नियंत्रण त्याचप्रमाणे पेरणीपासून तर कापणीपर्यंतची माहिती सदरील कंपनी अभियानाअंतर्गत देण्यात येत असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना हि माहिती दिली जात आहे हे विशेष !
दरम्यान शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन वाढवीणे हि बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्याचबरोबर बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या मालाला जो भाव मिळतो त्यापेक्षा सेंद्रिय शेती केलेला माल शेतकरी हा कंपनीला देऊ शकतो याचीदेखील माहिती यावेळी देण्यात आली.प्रसंगी सुमितर् इंडिया ऑरगॅनिक कंपनीचे कर्मचारी पंकज वाघ,नागवशी साहेब,सचिन मेहसरे यांच्यासह आडगाव येथील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.