गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२९ ऑगस्ट २३ मंगळवार
युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दि.३० ऑगस्ट बुधवार रोजी सामुहीक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने हजारो भगिनी स्वयंस्फूर्तीने आमदार रवीभाऊ राणा यांना राखी बांधणार आहेत तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे युवा स्वाभिमान महिला आघाडीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रम युवा स्वाभिमान मुख्य कार्यालय राजापेठ,राजकमल रोड येथे बुधवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सामुहीक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारो भगिनी आमदार रवीभाऊ राणा यांना भाऊ मानून त्यांना राखी बांधून त्यांना ओवाळतात.प्रसंगी आमदार रवी राणा हे सुद्धा भगिनींना भेटवस्तू देवून त्यांचे रक्षण करण्याची हमी देतात.बहीण भावाच्या या पवित्र नात्याला भावनिकतेने जोपासून वृध्दींगत करण्यासाठी युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त भगिनीनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन युवा स्वाभिमान महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.