गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
तेल्हारा एसटी आगारात दि.१५ ऑगस्ट मंगळवार रोजी ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदरील ध्वजारोहण आगार व्यवस्थापक मिथुनजी शर्मा यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता करण्यात आले.यानिमित्ताने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
यावेळी आगार व्यवस्थापक मिथुनजी शर्मा यांनी ७६ व्या स्वातंत्रदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.प्रसंगी तेल्हारा एसटी आगाराचा अमरावती विभागातून स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्व चालक व वाहकांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना प्रवासी वाढवा व उत्पन्न वाढवा अशा सूचना दिल्या नंतर एसटी आगारामधील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमास सर्वश्री वैभवजी ठाकरे लिपिक,वाहतूक नियंत्रक गोपालजी पुरी,गजाननजी काकड,निवृत्ती वसतकार,अरुण पांडे,श्याम खडसे,विनोद शित्रे,नरेश मुराई,गजानन जवळकार,गोपाल धर्माळे,राजू वानखडे,अमोल पाथ्रीकर,अमोल पाटील,विजय गवई,केशव केदारे,सुरक्षा रक्षक श्रीकांत ताथोड,नाना धुंधळे, एस.एस.उमाळे,महेंद्र पिवाल सफाई कामगार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार रोहित इंगळे वाहतूक निरीक्षक यांनी मानले.