Just another WordPress site

मेळघाट रंगुबेली येथील आदिवासींची मोफत आरोग्य तपासणी

अंजनगाव सुजीऀ येथील लोक जागरसंघटन व माऊली फोंउडेंशनच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.३० ऑगस्ट २३ बुधवार

मेळघाट धारणी (रंगुबेली) येथील अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी वस्तीतील लोकांची अंजनगाव सुर्जी लोकजागर संघटना व माऊली फोऊंडेशनच्या वतीने नुकतीच मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी ३०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी देण्यात आली.

सदरील आरोग्य तपासणी शिबिरामध्ये अंजनगाव सुजीऀ येथील १० विविध विषयक्षेत्रातील वैद्यकीय तज्ञ मंडळी व त्यांच्या इतर १० सहकाऱ्यांनी समयदानासह सेवा प्रदान केली.त्याचबरोबर त्यापेक्षा ही अतिदुर्गम भागातील आदिवासी गरजवंत व्यक्तीसाठी लोकजागर संघटनेच्या माध्यमातून कुंड,खामदा व किन्हिखेडा येथे कपडे वाटप व त्या भागातील शैक्षणिक,शेतीअवजारेविषयक,आरोग्य विषयक,वीजपुरवठा,रस्ते, पाणी पुरवठा,शबरी घरकुल योजना,कुकींगगॅस व इतर प्रश्नांबाबत संवाद साधण्यात आला.यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कायाऀलयाचे निरिक्षक मावसकर साहेब धारणी व ग्रामसेवक रंगुबेली यांनी लोक जागरसंघटनच्या विनंतीनुसार कुंड,किन्हिखेडा,खामदा इत्यादी संबंधित ठिकाणी उपस्थित राहुन त्या भागातील समस्या ऐकून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सदरहू निसर्गाच्या कुशीतील निसर्गाचा आस्वादाची अनुभुतीसह नदी,धबधबा,नैसर्गिक गुफा इत्यादी निसर्गाच्या आविष्काराचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून या भागातील आदिवासीना सुध्दा अथाऀजन व्हावे म्हणून या भागातील पयऀटनविकासात्मक कायाऀसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व सोबतच या दुगऀमभागातील आदिवासी मंडळीच्या दु:खावर फुकंर घालून तेथील मुलभुत सुवीधासाठी कुठेतरी लोक जागरसंघटनच्या माध्यमातून हा प्रश्न वरिष्ठ कायाऀलया पयऀत पोहचवण्यासाठी व उचित न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त राहणार असल्याची भावना आदिवासी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी लहान मुले मुलींच्या चेहऱ्यावर कपडे,मातॄशक्तीना साडी व आदिवासी बंधूना कपडे स्विकारतांनाचा निखळ आनंद लोक जागरसंघटनच्या माध्यमातून व्दिगुणित केला जात आहे.

सदरहू या स्तुत्य उपक्रमाला अंजनगाव सुजीऀ तालुक्यातील शाळा,महाविद्यालय,नागरिक,स्वामी विवेकानंद जिवनज्योत संस्था पुणे इत्यादीचे सहकार्य मिळाले आहे त्यामुळेच अत्यंत दुर्गम भागात जेथे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही व वीज नाही,कोणत्याही विभागाचे अधिकारी पोहचणे कठीण,शासकीय योजनांची अंमलबजावणीची मुश्कील,इतर सुखसुविधा अत्यंत दुरापास्त व कठीण आहे अशा ठिकाणी २०० किमीचे अंतरावरून लोक जागरसंघटन अंजनगाव सुजीऀमाफऀत मिळालेल्या कपडे,भांडे,शालोउपयोगी साहित्य,पाणी बाॅटल्स,थंडीचे स्वेटर्स इत्यादी वस्तू चे ५०० आदिवासी आबालवृद्धांना लोकजागर संघटनेच्या वतीने करण्यात आले.यावेळी डॉ.कौस्तुभ पाटील,डॉ.संजय साबळे,डॉ.शोन देशमुख, डॉ.सचिन भोरे,डॉ.वैभव भुस्कट,डॉ.व्यवहारे यांच्या पथकाकडून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून समस्या जाणून निःशुल्क औषध वाटप करण्यात आले.प्रसंगी संजय धारस्कर,आनंद संगई,देवानंद महल्ले,हिमांशू गोल्डे,राजेंद्र हजारे,रजत दर्यापूरकर,जावरकर विनोद पारडे, अमोल ब्राम्हणकर,निखिल देशमुख,संतोष चव्हाण,मयूर अरबट,मनीष टांक,मोहन चौधरी,भैया काळमेघ,सुनील गवते,आशिष गांधी,सचिन गुरव,अतुल येवले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तिलोत्तोमा वानखडे धारणी,सरपंच ,मा .ग्रामसेवक मा.आरोग्य अधिकारी रंगुबेली ,श्री चव्हाण सर,जिल्हा परिषद केंद्र प्रमुख आशा वकऀर, पोलिस पाटील  यांचे सहकार्य लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.