गणेशपुर फाटा ते गायवाडी मार्गे कळाशी डांबरी रस्त्याचे कामाची गुणवत्ता कमी दर्जाची
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघा तर्फे बांधकाम विभागाला तक्रार
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३० ऑगस्ट २३ बुधवार
दर्यापूर तालुक्यातील गणेशपूर फाट्यापासून ते गायवाडी -कळाशी -आमला या मार्गे सुरू असलेले मुख्य रस्त्याचे बांधकाम चालू झाले आहे. अनेक वर्षे पासून रस्त्याची नुसती जोडवा जोड चालू होती.सदरील डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली परंतु सदर काम हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे व लापरवाई होत असल्याची तक्रार कळाशी येथील ग्रा.पं सदस्य तथा माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पंजाबराव गावंडे यांनी बांधकाम विभाग दर्यापूर येथे केली आहे.
सदर रस्त्याचे काम हे नियमाप्रमाणे होत नसून या कामावर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.सदरहू सदरील काम ईस्टिमेट प्रमाणे व्हावे व निकृष्ट असलेले काम हे नियमाप्रमाणे व्यवस्तीत करून घ्यावे तसेच झालेल्या कामाची गुणवत्ता तपासणी करावी व कामात दिरंगाई आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे अभिषेक गावंडे यांनी केली आहे.तसेच सदर रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता काम हे नियमाप्रमाणे नसून कामामध्ये वापरत असलेल्या व वापरलेल्या मटेरीयल मध्ये खुप जास्त प्रमाणात तफावत आहे आणि काही ठिकाणी तर रोड पूर्ण पणे डीसमेंटल न करताच कामाला सुरुवात केलेली आहे.
जागेची तपासणी करून सर्व रस्त्याची गुणवत्ता कायमस्वरूपी राहावी यासाठी बांधकाम विभाग लक्ष देण्याची गरज आहे नुसते अधिकाऱ्यांनी एसी मध्ये न राहता बाहेर निघुन रस्त्यावर लक्ष घालण्याची गरज आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे,अमोल राऊत,धनंजय पवार,ऋषी धाबे,शिवा बुध आदी कार्यकर्ते उपस्थित होते.