Just another WordPress site

बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत वैद्यकीय व्यवसायिकांची निवेदनाद्वारे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ सप्टेंबर २३ शुक्रवार

तालुक्यातील कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे एका आदिवासी महीलेच्या झालेल्या दुदैवी मृत्युच्या पाश्वभुमीवर यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायीकांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यावल यांना कारवाई करण्यासंदर्भात नुकतेच निवेदन दिले आहे.

सदरील निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक गावात बोगस डॉक्टर मुन्नाभाईनी आपली दुकाने उघडली असुन त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे रूग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असुन प्रसंगी काही लोकांना आपल्या जिवाला मुकावे लागत आहे. अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी तसेच कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या चुकीच्या उपचारामुळे दुदैवीरित्या मरण पावलेल्या त्या आदिवासी महिलेच्या प्रकरणात अद्याप पर्यंत आरोग्य प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसून सदरील आदिवासी महिलेस न्याय मिळावा व बोगस डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल तालुका वैद्यकीय व्यवसायीकांच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदरील निवेदनावर डॉ.कुंदन फेगडे,डॉ.धिरज पाटील,डॉ.धिरज चौधरी,डॉ.अमित तडवी,डॉ.दिपक चौधरी,डॉ.ईसरार खान,डॉ.रमेश पाचपोळे,डॉ.अभय रावते,डॉ.सतिषअस्वार,डॉ.पद्दमानभन देशपांडे,डॉ.बि.के.बारी,डॉ.सरफराज तडवी,डॉ.गौरव धांडे,डॉ.दाऊद खान,डॉ. तुषार सोनवणे,डॉ.अमोल महाजन,डॉ.युवराज चोपडे,डॉ.मनोहर महाजन,डॉ.हरीष महाजन,डॉ.चंद्रकांत चौधरी यांच्यासह आदी डॉक्टरांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.