Just another WordPress site

जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचा यावल येथे जाहीर निषेध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.४ सप्टेंबर २३ सोमवार

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी तालुका अबंड येथे मागील पाच दिवसापासुन मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी १ सप्टेंबर पासुन या गावात मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता प्रिय मार्गाने सुरू असलेले उपोषणास उधण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार व गोळीबार करून अनेक आंदोलनकर्ते यांना जखमी करण्यात आल्याच्या निषेधार्त शासनाचा यावल येथे आज दि.४ सप्टेंबर रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान आज दि.४ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता यावल सहकारी खरेदी विक्री संघातुन सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्यात मराठा समाजाच्या वतीने अतुल पाटील,प्रा.मुकेश येवले,अजय पाटील,उमाकांत पाटील,देवीदास धांगो पाटील,अनिल साठे,अॅड देवकांत पाटील,पवन पाटील,वसंत पाटील,विलास चंद्रभान पाटील,नानाजी प्रेमचंद पाटील,डी.सी.पाटील,डॉ.हेमंत येवले,डी.बी.पाटील,सुनिल गावडे,महेश पाटील,समाधान पाटील,ललीत पाटील,गौरव भोईटे,स्वप्नील चव्हाण,नरेन्द्र पाटील,यश पाटील,किरण पाटील,कोमल पाटील,शैलेश पवार,उदय पाटील,योगेश चव्हाण,विलास येवले,अमोल खैरनार,निळकंठ यादव,प्रकाश पवार,आशिष महाजन, कल्पेश पवार,चंद्रकांत येवले,बापु जासुद,गुणवंत पवार,अनिल पवार,संजय पवार,कमलाकर पाटील,किरण महाजन यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधवांनी यात आपला सहभाग नोंदविला.यावेळी जिल्हा परिषदचे माजी गट नेते प्रभाकर सोनवणे यांनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.