सम्राट कॉलनीतील नियमबाह्य पद्धतीने मूर्ती बनविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्षांची मागणी
भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ सप्टेंबर २३ बुधवार
येथील कंडारी भागातील सम्राट कॉलनी येथे प्लास्टिक ऑफ प्यारीसच्या मुर्त्या या नियमबाह्य पद्धतीने बनवून विक्री करण्यात आलेल्या आहेत यामुळे परिसरात हवा व पाण्याचे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होत असून या ठिकाणी सदरील उद्योग अजूनही सुरु असल्याने सदरहू नियमबाह्य पद्धतीने मूर्ती बनविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा कंडारी ग्रामपंचायत समोर ठिय्या व ताला ठोको आंदोलन करण्यात येईल तसेच सदरील मुर्त्या बनविणाऱ्यांवर २४ तासांच्या आत कारवाई करावी अन्यथा सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी कंडारी सरपंच व ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे कि,पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम १९८६ मधील तरतुदीनुसार प्लास्टिक ऑफ प्यारीस हद्दपार होण्याच्या दृष्टीने सन २०२२ च्या गणेशोत्सवापासून सूचनांची काटेकोर अमलबजावणी होणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले असतांना सुद्धा सम्राट कॉलनी भागात आजही मुर्त्या बनवून त्या विक्री करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहेत.याबाबत २१ ऑगस्ट २३ रोजी सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत कंडारी यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आलेले असतांना सुद्धा ग्रामपंचायत कडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.तसेच याबाबतीत प्रत्यक्षात वारंवार चर्चा करून देखील ग्रामपंचायत कडून सहकार्य करण्यात आलेले नाही.तरी परिसरातील जल व वायू प्रदूषण रोखण्याकरिता सदरील मुर्त्या बनविणाऱ्यांवर २४ तासाच्या आत कारवाई करून त्यांचा माल जप्त करण्यात यावा किंवा कारवाई न झाल्यास सरपंच व ग्रामसेवक यांनी राजीनामा द्यावा अन्यथा ८ सप्टेंबर २३ शुक्रवार रोजी कंडारी ग्रामपंचायत समोर ठिय्या व ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी कंडारी सरपंच व ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.सदरील निवेदनावर महेंद्रभाऊ पाटील यांच्यासह २४ गावकऱ्यांच्या सह्या आहेत.