Just another WordPress site

खासदार नवनीत राणा यांची शेतशिवारात जावून पिकांची पाहणी

गोपाल शर्मा,पोलीस नायक

विदर्भ विभाग प्रमुख

दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार

विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असून अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.मात्र कालच्या पावसाने बळीराजाला थोडा दिलासा मिळाला आहे.दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी दर्यापूर,अंजनगाव सुर्जी,तिवसा,चांदुर बाजार, भातकुली,चिखलदरा,धारणी,अचलपूर आदी तालुक्यात जावून पीक परिस्थितीचा आढावा घेतला.काल दि.६ सप्टेंबर बुधवार रोजी आसेगाव परिसरातील शेतशिवारात जावून खासदार नवणीत राणा यांनी पिकांची पाहणी करून जिल्हावासीयांना त्यांनी आपली कार्यतत्परता दाखवून दिली आहे.

विदर्भात पाऊस नसल्यामुळे कोरडा दुष्काळ पडण्याची भिती निर्माण झाली असून भरीस भर म्हणजे ज्यांच्याकडे ओलित करण्याची क्षमता आहे त्यांना विज पुरवठा होत नसून रात्री २ वाजता विज पुरवठा केला जात असल्यामुळे ग्रामीण भागात आजही लोडशेडींग सदृश्य परिस्थिती आहे.सदरहू अशा परिस्थितीत राज्यशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून २४ तास विज पुरवठा करावा तसेच पाऊस पुरेसा पडला नाही तर कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सांगितले.सोबतच प्रशासनाने देखील शेतकऱ्यांविषयी आस्था बाळगून आपले कर्तव्य निभवावे व बळीराजाला दिलास द्यावा असे निर्देश खासदार नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित कृषी,महसूल, व विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.तर शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुठल्याही परिस्थितीत हयगय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.प्रसंगी खासदार नवनीत राणा यांच्या समवेत तहसीलदार गीतांजली गरड,सरपंच कांचन रघुवंशी,तलाठी नरेश माळोदे,कृषी सहायक संजय किर्तीकर,कृषी पर्यवेक्षक जी.एस.काळे,कृषी सहायक एम.बी.होले,अचलपूर तालुकाध्यक्ष रवी गवई,बाल्या वाटाणे,जनार्दन बोबडे,कैलाश खाले,सत्यपाल कैथवास,जयाजी वाटाणे,अमोल वाटाणे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.