सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार
तालुक्यातील धामणगाव बढे शहरात पुन्हा एकदा चोरटे सक्रीय झाले असून काल दि.६ सप्टेंबर बुधवार रोजी टिपु सुलतान चौकातील अताउर रहेमान अब्दुल रशीद यांच्या धान्याच्या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्याने दुकानात लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले ४८ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,धामणगाव बढे येथे दि.१८ मे २३ रोजीच्या मध्यरात्री बिस्मिल्ला मापारी यांचे जैद ट्रेडस दुकान फोडुन ५१ हजार रुपये चोरीची घटना घडली होती.त्यानंतर पुन्हा आता ब्रेक के बाद शहरात चोरटे सक्रीय झाले असून काल दि.६ सप्टेंबर बुधवारच्या रात्री २.३० ते सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास सदरील चोरीची घटना उघडकीस आली आहे.टिपु सुलतान चौक परिसरातील अताउर रहेमान अब्दुल रशीद वय ४४ वर्ष यांच्या धान्याच्या दुकानाचे शटर उचकवून दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने दुकानातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले नगदी ४८ हजार रुपये रोख लंपास केले आहे.याबाबत अताउर रहेमान अब्दुल रशीद राहणार धामणगाव बढे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अप क्रमांक २५६/२३ च्या कलम ३८०,४६१ नुसार गुन्हा धामणगांव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सुरेश सोनवणे करीत आहेत.