यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील परसाडे या आदिवासी वस्तीच्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपशिक्षीका कल्पना माळी यांनी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने मुंबई येथे एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
तालुक्यातील परसाडे या आदिवासी गावात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपशिक्षीका कल्पना देवीदास माळी यांना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने दिला जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.मुंबई येथे दि.५ सप्टेंबर रोजी टाटा नाटयगृहात शिक्षक दिनानिमित्त संपन्न झालेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार,शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर,मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा,शालेय शिक्षण विभागाचे राज्य सचिव रणजीतसिंग देओल आदी मान्यवरांच्या उपस्थित कल्पना देविदास माळी यांना सन्मानपत्र व एक लाख दहा हजार रुपये अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कल्पना माळी यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल परसाडे गावाच्या प्रथम नागरीक लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी,उपसरपंच सुलेमान तडवी,जिल्हा परिषद माजी सदस्या सविता भालेराव,वड्री सरपंच अजय भालेराव,उपसरपंच पंकज चौधरी,ग्रामसेवक मजीत तडवी,परसाडे शाळेच्या मुख्याध्यापिका हसीना तडवी व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांनी कल्पना माळी यांचे अभिनंदन केले आहे.