डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
दि.८ सप्टेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील अडावद येथील कामधेनु दूध उत्पादक संस्था चेअरमन संजय मुरलीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभासदांना दि.६ सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी वाजता संस्थेच्या सभागृहात सदरील भाव फरक रक्कम वाटप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी जळगाव दूध संघाचे संचालिका छाया गुलाबराव देवकर व संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे उपस्थित होते.सदरहू त्यांच्याच हस्ते भाव फरकाची रक्कम व भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.प्रसंगी अडावद पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश बुवा,कामधेनु संस्थेचे चेअरमन संजय मुरलीधर पाटील,जयनारायण दहाड,साखरलाल महाजन,संभाजी पाटील,के.व्ही.देशमुख,नंदकुमार देशमुख,दिनकर देशमुख,मनोज देशमुख,राजेंद्र देशमुख,महेंद्र देशमुख,माजी चेअरमन राधाकृष्ण बाहेती,उमेश देशमुख,निलेश देशमुख,दामू पाटील,ज्योती सुर्वे,आरसतोल पाटील,अनिल देशमुख,चाहतअली काझी,प्रदीप पाटील,जळगाव जिल्हा दूध संघ अंतर्गत कृत्रिम रेतन तंत्रज्ञ डॉ.सतीश भदाणे(पत्रकार),हरीश पाटील,सचिन माळी,पी.आर.माळी,मधुकर कासार,भगवान काशिनाथ पाटील,हाफिज्जोड्डीन मलिक,वसंत धनगर,नाना माळी,डि.के,नथू खंबायत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक मंडळ गावातील प्रमुख पाहुणे व इतर प्रतिष्ठित व्यक्ती यांची उपस्थिती होती.यानिमित्ताने कामधेनु संस्थेने म्हैस वर्ग एक रुपया ८५ पैसे प्रति लिटर,गाय वर्ग ५० पैसे प्रति लिटर असा भाव फरक जवळ जवळ ८.६३ लाख संस्थेतर्फे वाटप करण्यात आला.अधिक दूध पुरवठा करणारे म्हैस वर्गामध्ये पहिले ८ दूधउत्पादकांना प्रत्येकी १५ लिटर कॅन व एक घमेली तसेच गाय वर्ग अधिक दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक गेल्या २ वर्षापासून संस्था संघाच्या दुध खरेदी भावापेक्षा ५० पैसे जादा देऊन खरेदी करत आहे.यावेळी दूध संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक संस्थेचे सचिव पंकज देशमुख यांनी केले तर सदर कार्यक्रमाला संस्थेचे मापारी,टेस्टर व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.