Just another WordPress site

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदारांना अच्छे दिन

तिन महिन्यांत विविध कामांसाठी मिळाला प्रत्येकी ७० ते ८० कोटींचा निधी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाविकास आघाडीत निधीसाठी संघर्ष करावा लागलेल्या आमदारांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत.‘पत्र दिले की निधी’असे सूत्रच शिंदे-फडणवीस सरकारने अवलंबले आहे.आमदारांची नाराजी दूर करून अडीच वर्षे सरकार टिकवणे आणि तोंडावर आलेल्या महापालिका,जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा त्यामागील हेतू असल्याचे बोलले जात आहे.तर महाविकास आघाडीतील आमदारांना मतदारसंघातील विकासकामांचा निधी देताना दुजाभाव केला विशेषत: शिवसेनेच्या मतदारसंघात पराभूत उमेदवारांना अधिक निधी दिला अशा कारणांवरून महाविकास आघाडीत फूट पडली.त्यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही राष्ट्रवादीने स्वत:च्या वाट्याला सर्वाधिक निधी घेतला असाही आरोप झाला.तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुखांशीच फारकत घेत भाजपशी सलोखा साधला आणि राज्यात सत्तांतर झाले.यात अपक्षांसह ५० आमदारांना घेऊन भाजपसोबत हातमिळवणी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मागेल तेवढा निधी द्यायला सुरवात केली. भाजपही त्यांच्या १०५ आमदारांना भरघोस निधी देत आहे.दरम्यान निधी कमी पडल्यास आमदार नाराजी होतील या भितीपोटी मुख्यमंत्री दिल्लीवारी करीत असल्याची चर्चा आहे.राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने केंद्राकडून ठाकरे सरकारच्या तुलनेत शिंदे-फडणवीस सरकारला अमृत योजना,तालुक्यातील रस्ते आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मोठा निधी मिळत असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

   आमदार निधीशिवाय अन्य निधीच नव्हता

महाविकास आघाडी सरकारने आमदार निधीशिवाय अन्य निधी देताना दुजाभाव केला.पाच रुपयांच्या निधीसाठी सुध्दा संघर्ष करावा लागला. कोरोना काळात आमदार निधीसुध्दा पुरेसा दिला नाही.आता सत्तांतरानंतर तीन महिन्यांत रस्त्यांसह विविध कामांसाठी ६५ ते ७० कोटींचा निधी मिळाला असे माजी सहकारमंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.आमदार सचिन कल्याणशेट्टी व भाजपपुरस्कृत बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत म्हणाले सत्तांतरानंतर विकासकामांसाठी मागेल तेवढा निधी मिळू लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.