Just another WordPress site

चोपडा तालुका शासनमान्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी राधेश्याम पाटील तर सचिवपदी मनोहर पाटील

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी):-

दि.९ सप्टेंबर २३ शनिवार

चोपडा तालुका सार्वजनिक ग्रंथालय संघांच्या अध्यक्षपदी राधेश्याम गोपाल पाटील ( खर्डी ) ,व सचिवपदी मनोहर गोरख पाटील ( वटार) यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

सदरील निवड सभेच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतिष डी.पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष रविंद्र पाटील,संजय पाटील,रावसाहेब पाटील तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकाऱी उपस्थित होते.निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष राधेश्याम गोपाल पाटील खर्डी,सचिव मनोहर गोरख पाटील वटार,उपाध्यक्ष किरण विठ्ठल बडगुजर अकुलखेडे,कार्याध्यक्ष चंद्रकांत रामसिंग बाविस्कर गोरगावले,सहसचिव गोपाल शरद दांडेकर चोपडा,कोषाध्यक्ष देवानंद लक्ष्मण पाटील निमगव्हाण,सदस्य केदार गंगाराम पाटील घाडवेल,विठ्ठल पुंडलिक पाटील घोडगाव,अनिस अहमद गयासुद्दीन चोपडा यांची निवड बिनविरोध व एकमताने करण्यात आली.सदर सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नरेंद्र पाटील ( लोणी ) यांनी केले.यावेळी चोपडा तालुक्यातील शासनमन्य सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय पदाधिकाऱी व ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थितीत होते.सदरील निवडीबद्दल त्यांचे अडावद व चोपडा परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.